नमस्ते डेलीहंट

भारतीय मोबाईल युजर्सना प्रादेशिक भाषेत बातम्या आणि वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पाच वर्षांपूर्वी आम्ही न्यूजहंट सुरू केले.

तेव्हापासून ते आजतागायत बातम्या आणि ई-पुस्तकांमधील हे एक अग्रगण्य अॅप्लिकेशन ठरले आहे. लोकांना स्थानिक बातम्या देत असतानाच पुस्तके, मासिके, कॉमिक्सदेखील उपलब्ध करून देण्याचा पर्याय आम्ही अनुसरला.

आजवर आमचे लाखो युजर्स आहेत, परंतु आमचे उद्दिष्ट अजूनही बदललेले नाही. कुठल्याही डिव्हाइसवर लोकांना त्यांच्या आवडत्या भाषेत वाचन साहित्य सहजासहजी उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

आज आम्ही न्यूजहंटच्या एका सुधारित आवृत्तीची ओळख करून देत आहोत – ज्याचे नाव आहे डेलीहंट.

डेलीहंट अॅपमध्ये ती सर्वच वैशिष्ट्य आहेत जी तुम्ही न्यूजहंटमध्ये अनुभवली आणि तुम्हाला आवडली. आता त्याहूनही अधिक चांगले वैशिष्ट्य, तेही तुमच्या भाषेत डेलीहंटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्हाला दर्जेदार साहित्य अगदी सहजरीत्या शोधून ते वाचने शक्य होईल हे तर स्पष्टच आहे.

आता आपले अपडेटेड व्हर्जन मिळवा अॅड्रॉईड मोबाईलवर. आयफोन/आयपॅड आणि विंडोज फोनकरिता लवकरच अपडेटेड व्हर्जन उपलब्ध करून देण्यात येईल.

डेलीहंटमध्ये नवीन काय आहेः

नवीन डिझाइनः वाचकांना अगदी सहज, स्पष्ट आणि विनाअडथळा वाचनाची अनुभूती घेता यावी म्हणून आम्ही या अॅपची निर्मिती केली आहे. ज्या विषयांच्या तुम्ही शोधात आहात ते अगदी सहजरीत्या शोधणे तुम्हाला शक्य होईल, जेणेकरून तुमच्या भाषेतील वाचन साहित्याशी तुमची जवळीकता वाढेल आणि त्याचा आस्वाद घेता येईल.

वैयक्तिक आवड-निवड:

ज्या विषयात तुम्हाला रस आहे आणि ज्या पद्धतीच्या वाचनसाहित्याच्या तुम्ही शोधात असता त्यानुसार तुमची आवड लक्षात घेऊन आम्ही आपणांस बातम्या, पुस्तके आणि व्हिडीओज उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुम्हाला संबधित विषयाची खोलवर व अधिकाधिक माहिती मिळेल.

आवडते विषय­:

आपले आवडते विषय आणि बातम्यांचे स्त्रोत वाचनासाठी सहज उपलब्ध व्हावेत याकरिता ते टॅग करा आणि हव्या त्या बातम्या वाचा. अगदी स्थानिक पातळीपासून ते तंत्रज्ञान, प्रवास, रेसीपीज अशा विविध विषयातील बातम्या तुम्हाला आपल्या भाषेत वाचायला मिळतील.

सुट्या प्रकरणांची खरेदीः पुस्तकाची खरेदी करताना एक उत्तम पर्याय आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे, तो म्हणजे सुट्या प्रकरणांची खरेदी. वाचक आणि प्रकाशकांच्या विनंतीवरूनच हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकरणांनुसार विक्री या पर्यायामुळे दररोज अधिकाधिक पुस्तकांची भर पडत आहे. Dailyhunt chapter wise billing

नवीन भाषाः आता आईं ना(भोजपूरी) वाचकांसाठी देखील बातम्या, वाचनसाहित्य उपलब्ध आहे. शिवाय आसामी, सिंधी आणि नेपाळी भाषेतही लवकरच ते उपलब्ध करून देण्यात येईल.

नवीन देशः आता आम्हाला श्रीलंका आणि यु.ए.ई. मध्ये या अॅपची सेवा देण्यात आनंद होत आहे. अजूनही बरंच काही द्यायचं बाकी आहे, आणि आम्हाला आशा आहे, की आम्ही ज्या वैशिष्ट्यांसह हे डेलीहंट अॅप बनवले आहे त्या सर्वच वैशिष्ट्यांचा तुम्हाला पुरेपुर लाभ घेता येईल.

आणि सरतेशेवटी..

इतक्या वर्षांपासून आपण दिलेल्या या पाठिंब्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्हाला तुमच्या शब्दांत ऐकायला नक्कीच आवडेल. आम्ही अधिकाधिक चांगली सेवा कशी उपलब्ध करून देऊ शकतो याविषयी आम्हाला जरूर कळवा.

आजच अॅंड्रॉइड मोबाईलमध्ये डेलीहंट डाउनलोड करा

– डेलीहंट टीम

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s