आत्मविकासात पुस्तकांचा वाटा महत्त्वाचा का व कसा..?

Marathi-blog

कष्टाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम हे घ्यावेच लागतात. आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी स्वावलंबी होणे, आत्मविकास करणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही यशासाठी धडपड करत असते. प्रयत्नांती अपयश पदरी पडले तर ती व्यक्ती नैराश्याला बळी पडते व पुन्हा प्रयत्न करायचे सोडून देते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयोगी पडतो तो आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास विकसित करण्याचे काम चांगली पुस्तके करत असतात.

एक चांगली, आदर्श व यशस्वी व्यक्ती बनणं हे जर आपण आपलं उद्दिष्ट मानलं तर आपलं वर्तन, आपले विचार, कृती प्रभावी बनवल्याशिवाय ते साध्य होऊ शकणार नाही; जर आपण आपलं वर्तन प्रभावी बनवू शकलो तर त्यातून साकारणारं व्यक्तिमत्त्व प्रभावी म्हणूनच संबोधलं जाईल. अर्थात, ‘वर्तनातून साकारणारं व्यक्तिमत्त्व ‘प्रभावी’ बनण्यासाठी काय करावं?’ तर पुस्तके वाचावी.

आत्मविकास करण्यासाठी नेमकी कुठली पुस्तके आपण वाचतो हे विचारात घेणेदेखील खूप महत्त्वाचे असते. तुमच्या आत्मविकासात उपयुक्त व मार्गदर्शक ठरतील अशा 20 पुस्तकांची निवड आम्ही तुमच्यासाठी केली आहे. नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचार कसा करावा, व्यक्तिमत्त्व प्रभावी बनविण्यासाठी काय प्रयत्न करावे, सुसंवादाची कौशल्य आत्मसात कशी करावी, निर्णयशक्की कशी वाढवावी, कशी विकसित करावी, उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रयत्न कसे करावे, कोणत्याही कामात यश प्राप्त करण्याकरिता एकाग्रता कशी मिळवावी, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांची मने कशी जिंकावी, एक यशस्वी वक्ता, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणते गुण अंगी विकसित करावे अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी काही पुस्तके पुढे दिली आहेत. क्लिक करा, पुस्तके वाचा अन् आत्मविकास करा. आत्मविकासासाठी 20 पुस्तकांची सविस्तर यादी येथे.

स्वामी विवेकानंदांची जीवनसुत्रे, मी जिंकणारच!, एकाग्रता, कार्यवेडे व्हा, स्वप्न उद्योजकांचे, कला संभाषणाची, मेमरी पॉवर, प्रभावी बोलण्याची ४० सुत्रे, निर्णयशक्ती इत्यादी.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s