आत्मविकासात पुस्तकांचा वाटा महत्त्वाचा का व कसा..?

Marathi-blog

कष्टाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम हे घ्यावेच लागतात. आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी स्वावलंबी होणे, आत्मविकास करणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ही यशासाठी धडपड करत असते. प्रयत्नांती अपयश पदरी पडले तर ती व्यक्ती नैराश्याला बळी पडते व पुन्हा प्रयत्न करायचे सोडून देते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी उपयोगी पडतो तो आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास विकसित करण्याचे काम चांगली पुस्तके करत असतात.

एक चांगली, आदर्श व यशस्वी व्यक्ती बनणं हे जर आपण आपलं उद्दिष्ट मानलं तर आपलं वर्तन, आपले विचार, कृती प्रभावी बनवल्याशिवाय ते साध्य होऊ शकणार नाही; जर आपण आपलं वर्तन प्रभावी बनवू शकलो तर त्यातून साकारणारं व्यक्तिमत्त्व प्रभावी म्हणूनच संबोधलं जाईल. अर्थात, ‘वर्तनातून साकारणारं व्यक्तिमत्त्व ‘प्रभावी’ बनण्यासाठी काय करावं?’ तर पुस्तके वाचावी.

आत्मविकास करण्यासाठी नेमकी कुठली पुस्तके आपण वाचतो हे विचारात घेणेदेखील खूप महत्त्वाचे असते. तुमच्या आत्मविकासात उपयुक्त व मार्गदर्शक ठरतील अशा 20 पुस्तकांची निवड आम्ही तुमच्यासाठी केली आहे. नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचार कसा करावा, व्यक्तिमत्त्व प्रभावी बनविण्यासाठी काय प्रयत्न करावे, सुसंवादाची कौशल्य आत्मसात कशी करावी, निर्णयशक्की कशी वाढवावी, कशी विकसित करावी, उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रयत्न कसे करावे, कोणत्याही कामात यश प्राप्त करण्याकरिता एकाग्रता कशी मिळवावी, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांची मने कशी जिंकावी, एक यशस्वी वक्ता, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणते गुण अंगी विकसित करावे अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी काही पुस्तके पुढे दिली आहेत. क्लिक करा, पुस्तके वाचा अन् आत्मविकास करा. आत्मविकासासाठी 20 पुस्तकांची सविस्तर यादी येथे.

स्वामी विवेकानंदांची जीवनसुत्रे, मी जिंकणारच!, एकाग्रता, कार्यवेडे व्हा, स्वप्न उद्योजकांचे, कला संभाषणाची, मेमरी पॉवर, प्रभावी बोलण्याची ४० सुत्रे, निर्णयशक्ती इत्यादी.

वाचाल तर वाचाल!

‘वाचाल तर वाचाल’ असं आपण अनेकदा ऐकतो अन् ते खरंही आहे. खूप खूप वाचवं, चांगलं साहित्य नजरेखालून घालावं असं आपल्याला ब-याचदा वाटतं. पण काय वाचावे, सुरूवात कशी करावी असा प्रश्नदेखील पडतो. म्हणूनच ही ५ उत्कृष्ट पुस्तके खास तुमच्यासाठी आम्ही निवडली आहेत. आवर्जून वाचा, तुम्हाला नक्कीच आवडतील!

1. लढे अंधश्रद्धेचे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देऊन महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही विवेकवादाची रुजवण केली. त्यासाठीच त्यांनी बलिदानही दिले. सामान्य लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा उठवणा-या भोंदू साधूंची, बुवां-बायांची प्रकरणे दाभोलकरांनी उघडकीस आणली. ज्योतिष, वास्तूशास्त्र, पुत्रप्राप्तीचे चमत्कार, नाडी भविष्य अशा अनेकानेक अंधश्रद्धांना दाभोलकरांनी चाप लावला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात असे जे महत्त्वाचे लढे दिले त्यावर आधारित लेखांचे हे पुस्तक. मानवतेची आणि विवेकवादाची कास धरणा-या प्रत्येकाने हे लेख वाचायलाच हवेत.

2. सभेत कसे बोलावे? – आपल्या अंगी नेतृत्व गुण असावे, आपल्या बोलण्यातून समोरची व्यक्ती प्रभावित व्हावी, सभेत बोलताना लोकांनी आपल्या बोलणं लक्षपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं; पण बोलायची भीती वाटते. मग हे पुस्तक तुमच्यासाठीच… कारण या पुस्तकात सभेत प्रभावीपणे बोलता येण्यासाठी आवश्यक तंत्र, मंत्र आणि उपाययोजना दिल्या आहेत. वक्तृत्व म्हणजे काय, भाषणाचा विषय, त्याची सुरुवात आणि शेवट असे अनेक मार्गदर्शक मुद्दे यात आहेत. सोबतच श्रोत्यांची मने जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्सही आहेत.

3. शिवाजी कोण होता? – छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण गोविंद पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा’ कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी’चा राजा होता, ते या पुस्तकातून दाखवून दिलं आहे. इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.

4. शेरलॉक होम्सः द व्हॅली ऑफ फिअर – डिटेक्टिव्ह, हेरगिरीच्या कथा ज्यांना आवडतात, त्यांना ही कादंबरी नक्कीच खिळवून ठेवेल. डोक्यावर हॅट, ओठांमध्ये चिरूट, हातात काठी अशा वेशभूषेतील शेरलॉक होम्स ‘बऱ्याचदा सत्य कल्पनेपेक्षा थरारक असतं,’ असं सांगतो. अमेरिका आणि युरोपशी संबंधित या कथेत शेरलॉक होम्स त्याच्या तीक्ष्ण बुद्धीच्या साह्याने अत्यंत अवघड कोडे सोडवितो. भयाच्या, भीतीच्या या दरीत खोल बुडी मारून सत्य शोधून काढण्याच्या त्याच्या रोमांचकारी प्रवासात तुम्हीही सामील झाल्याचा भास तुम्हाला होईल, अशी ही कांदबरी.

5. चाणक्यनीती – आजच्या जगात मॅनेजमेंट हा जणू परवलीचा शब्द झालाय, इतकं अपार महत्व ह्या शब्दाला आलंय. मेहनत करणाऱ्या, काम करणाऱ्या व्यक्तीला आजच्या घटकेला अनंत संधी उपलब्ध होताहेत आणि अनेक नव्या वाटा त्याच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण होताहेत. शिवाय त्याच्या कर्मफलाची प्राप्तीही त्याला लगोलग मिळते आहे. हाती आलेल्या संधीचं सोनं करायला मात्र मनुष्याच्या अंगी धडाडी नी चातुर्यही तसंच असावं लागतं. आर्य चाणक्यांनी मानवी जीवनाचे आदर्श या पुस्तकांत मांडले आहेत. जीवनाच्या प्रत्येक बाजूकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. धर्म, शिक्षण, संस्कृती, विदवान, समाज, शांतता, न्याय, कुळ असे अनेक विषय त्यांनी हाताळले. त्यांच्या विचारांचा अर्थासहित संग्रह म्हणजे `व्यवहार्य उपयोगासाठी चाणक्यनीती’ हा होय.

collage

तुम्ही न्यूजहंटला डेलीहंटमध्ये अपग्रेड केले का?

मित्रहो,

तुमचे आवडते ‘न्यूजहंट’ अॅप आता ‘डेलीहंट’ नावाने नव्या रूपात आले आहे.

downloadApp11

डेलीहंटमध्ये ती सर्व वैशिष्ट्ये आहेत जी तुम्ही न्यूजहंटमध्ये बघितली,अनुभवली. शिवाय,हे अॅप आता तुमच्या भाषेतही उपलब्ध आहेच. विशेष म्हणजे यात अशी काही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत ज्यामुळे तुम्हाला अधिकाधिक बातम्या, पुस्तके, कॉमिक्स आणि इतर बरंच काही वाचता तसेच शोधता येणे सहजशक्य आहे. मग वाट कशाची बघताय? आजच डेलीहंट अॅप डाउनलोड करा!

डेलीहंट व्हीडिओ स्पर्धा

डेलीहंट प्ले स्टोरवर येऊन आता महिने उलटले आणि आपली एक स्वतंत्र ओळखही निर्माण केली. आमच्या जुन्या व नवीन हजारो युजर्सचे खूप खूप आभार, की ज्यांनी या नवीन अॅपचे स्वागत केले, ह्याला आपल्या अमूल्य अभिप्रायची जोड देऊन खूप मोठं बनवलं. विशेष म्हणजे आता आम्ही आमच्या फेसबुक आणि ट्विटर  वर आपल्यासाठी काहीतरी खास आणि प्रोत्साहनपर अशा एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. यात तुम्हाला फक्त डेलीहंटचा व्हीडिओ बघायचा आहे आणि त्यावर आधारित अत्यंत सोप्या प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियावर द्यायची आहे. जो विजेता ठरेल त्याला मिळेल डेलीहंटकडून एक आकर्षक भेटवस्तू! चला, तर मग..व्हीडिओ बघा आणि शोधा #AurKyaChalRahaHai

आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा
आम्हाला फेसबुकवर लाईक करा
आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

आता आम्ही टीव्हीवर झळकतोय!

प्रिय वाचकहो,
आपले आवडते न्यूजहंट आता नवीन स्वरूपात दाखल झाले आहे आणि हे नवीन स्वरूप म्हणजे – डेलीहंट ! आता टीव्ही जाहिरातीत डेलीहंट झळकतयं, त्यामुळे घरबसल्या तुम्ही आपल्या टीव्हीवर डेलीहंटचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

डेलीहंटमध्ये ते सर्वच वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला न्यूजहंटमध्ये आवडत असत, किंबहूना त्यापेक्षाही अधिक चांगले वैशिष्ट्य, तेही तुमच्या भाषेत या अॅपवर उपलब्ध आहेत. डेलीहंटवर तुम्हाला अगदी सहज, स्पष्ट आणि भरपूर नवीन वैशिष्ट्यांसह वाचनाची अनुभूती घेता येईल. तसेच विविध लेख,पुस्तके,कॉमिक्स आणि बरंच काही अगदी सहजरीत्या शोधून वाचने यावर शक्य असल्यामुळे वाचनाची मजा तुम्ही अनुभवाल. मग वाट कसली बघताय..आजच डेलीहंटला आपलसं करा.

याशिवाय एक विशेष अन् आनंदाची बाब म्हणजे, आम्ही आमच्या फेसबुक और ट्विटर  वर आपल्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. यात तुम्हाला फक्त डेलीहंटचा व्हीडिओ बघायचा आहे आणि त्यावर आधारित अत्यंत सोप्या प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियावर द्यायची आहे. जो विजेता ठरेल त्याला डेलीहंटकडून एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल! तेव्हा विसरू नका, आजच डाउनलोड करा डेलीहंट आपल्या मोबाईलवर आणि शोधा #AurKyaChalRahaHai

आम्हाला फेसबुकवर लाईक करा
आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

नमस्ते डेलीहंट

भारतीय मोबाईल युजर्सना प्रादेशिक भाषेत बातम्या आणि वाचनसाहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पाच वर्षांपूर्वी आम्ही न्यूजहंट सुरू केले.

तेव्हापासून ते आजतागायत बातम्या आणि ई-पुस्तकांमधील हे एक अग्रगण्य अॅप्लिकेशन ठरले आहे. लोकांना स्थानिक बातम्या देत असतानाच पुस्तके, मासिके, कॉमिक्सदेखील उपलब्ध करून देण्याचा पर्याय आम्ही अनुसरला.

आजवर आमचे लाखो युजर्स आहेत, परंतु आमचे उद्दिष्ट अजूनही बदललेले नाही. कुठल्याही डिव्हाइसवर लोकांना त्यांच्या आवडत्या भाषेत वाचन साहित्य सहजासहजी उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

आज आम्ही न्यूजहंटच्या एका सुधारित आवृत्तीची ओळख करून देत आहोत – ज्याचे नाव आहे डेलीहंट.

डेलीहंट अॅपमध्ये ती सर्वच वैशिष्ट्य आहेत जी तुम्ही न्यूजहंटमध्ये अनुभवली आणि तुम्हाला आवडली. आता त्याहूनही अधिक चांगले वैशिष्ट्य, तेही तुमच्या भाषेत डेलीहंटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्हाला दर्जेदार साहित्य अगदी सहजरीत्या शोधून ते वाचने शक्य होईल हे तर स्पष्टच आहे.

आता आपले अपडेटेड व्हर्जन मिळवा अॅड्रॉईड मोबाईलवर. आयफोन/आयपॅड आणि विंडोज फोनकरिता लवकरच अपडेटेड व्हर्जन उपलब्ध करून देण्यात येईल.

डेलीहंटमध्ये नवीन काय आहेः

नवीन डिझाइनः वाचकांना अगदी सहज, स्पष्ट आणि विनाअडथळा वाचनाची अनुभूती घेता यावी म्हणून आम्ही या अॅपची निर्मिती केली आहे. ज्या विषयांच्या तुम्ही शोधात आहात ते अगदी सहजरीत्या शोधणे तुम्हाला शक्य होईल, जेणेकरून तुमच्या भाषेतील वाचन साहित्याशी तुमची जवळीकता वाढेल आणि त्याचा आस्वाद घेता येईल.

वैयक्तिक आवड-निवड:

ज्या विषयात तुम्हाला रस आहे आणि ज्या पद्धतीच्या वाचनसाहित्याच्या तुम्ही शोधात असता त्यानुसार तुमची आवड लक्षात घेऊन आम्ही आपणांस बातम्या, पुस्तके आणि व्हिडीओज उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुम्हाला संबधित विषयाची खोलवर व अधिकाधिक माहिती मिळेल.

आवडते विषय­:

आपले आवडते विषय आणि बातम्यांचे स्त्रोत वाचनासाठी सहज उपलब्ध व्हावेत याकरिता ते टॅग करा आणि हव्या त्या बातम्या वाचा. अगदी स्थानिक पातळीपासून ते तंत्रज्ञान, प्रवास, रेसीपीज अशा विविध विषयातील बातम्या तुम्हाला आपल्या भाषेत वाचायला मिळतील.

सुट्या प्रकरणांची खरेदीः पुस्तकाची खरेदी करताना एक उत्तम पर्याय आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे, तो म्हणजे सुट्या प्रकरणांची खरेदी. वाचक आणि प्रकाशकांच्या विनंतीवरूनच हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकरणांनुसार विक्री या पर्यायामुळे दररोज अधिकाधिक पुस्तकांची भर पडत आहे. Dailyhunt chapter wise billing

नवीन भाषाः आता आईं ना(भोजपूरी) वाचकांसाठी देखील बातम्या, वाचनसाहित्य उपलब्ध आहे. शिवाय आसामी, सिंधी आणि नेपाळी भाषेतही लवकरच ते उपलब्ध करून देण्यात येईल.

नवीन देशः आता आम्हाला श्रीलंका आणि यु.ए.ई. मध्ये या अॅपची सेवा देण्यात आनंद होत आहे. अजूनही बरंच काही द्यायचं बाकी आहे, आणि आम्हाला आशा आहे, की आम्ही ज्या वैशिष्ट्यांसह हे डेलीहंट अॅप बनवले आहे त्या सर्वच वैशिष्ट्यांचा तुम्हाला पुरेपुर लाभ घेता येईल.

आणि सरतेशेवटी..

इतक्या वर्षांपासून आपण दिलेल्या या पाठिंब्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्हाला तुमच्या शब्दांत ऐकायला नक्कीच आवडेल. आम्ही अधिकाधिक चांगली सेवा कशी उपलब्ध करून देऊ शकतो याविषयी आम्हाला जरूर कळवा.

आजच अॅंड्रॉइड मोबाईलमध्ये डेलीहंट डाउनलोड करा

– डेलीहंट टीम